अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यानंतर, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत.
वेळ पडली, तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन,” असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची एक क्लिप शुक्रवारी व्ह्यायरल झाली.
यात, त्यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करत, आत्महत्येचे विचार मनात येत असल्याची धमकी दिली होती. लंके यांचे थेट नाव घेतले नसले तरी, देवरे यांचा रोख त्यांच्यावरच होता.
लंके यांच्यावर आरोप झाल्याने व देवरे यांनी आत्महत्येची धमकी दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांनीही लंके याना लक्ष्य करत टीकेची राळ उठविली होती.
देवरे यांच्या आरोपानंतर दुपारी लंके यांनी यासंदर्भात खुलासा केला. देवरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांनी व्यथित होऊन, असे बेछूट आरोप केले आहेत.
यासंदर्भातील चौकशी अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविल्यानंतर देवरे यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम