अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यात शनिवारी दमदार पावसाच्या आगमनाने १६ ऑगस्टपासून सुरू झालेले मघा नक्षत्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासादायक ठरले आहे. घाटमाथ्यावर पाऊस मंदावला असल्याने मुळा धरणात येणारी पाण्याची आवक कमी आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे आज १२ तासात धरणात ९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला आहे. शनिवारी दुपारी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाचे आगमन झाले. सायंकाळी उशिरापर्यंत राहुरीत रिमझिम पाऊस सुरूच होता.
शुक्रवारच्या पावसाची राहुरी ४ मिलीमीटर, कोतुळ १४ मिलीमीटर, मुळानगर ८१ मिलीमीटर नोंद झाली. शनिवारी सायंकाळी ६ वाजता पाणलोट क्षेत्रातील कोतूळकडून मुळा धरणात १२०१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळपर्यंत धरणाचा पाणीसाठा १८ हजार ५०२ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ७१ टक्के भरले आहे.
मागील वर्षी आजच्या दिवशी सायंकाळपर्यंत धरणाचा पाणीसाठा २० हजार ८९६ दशलक्ष घनफूट होऊन धरण ८० टक्के भरले होते. तर घाटमाथ्यावर पाऊस टिकून अाहे. २१ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता कोतुळकडुन मुळा धरणात ९ हजार १५५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
मागील वर्षीच्या तुलनेत शनिवारी सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा २ हजार ४०० दशलक्ष घनफूटाने कमी भरला आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १८ हजार ५०२ दशलक्ष घनफूट आहे.
मागील वर्षी आजच्या दिवशी धरणाच्या पाणीसाठ्याची २० हजार ८९६ दशलक्ष घनफूट नोंद होऊन धरण ८० टक्क्यांपर्यंत भरले होते. शनिवारी सायंकाळी मुळा धरणाची पातळी १७९७.६० फूट होती. मागील वर्षी मुळा धरणामध्ये आजच्या दिवशी सायंकाळपर्यंत पाणी पातळीची १८०२.६० फूट नोंद झाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम