बिबट्याच्या दर्शनाने ‘या’ परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे सावट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- सध्या बिबट्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचे भय अद्याप कायम असतानाच राहता तालुक्‍यातील काही ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांसह पशुपालकांमध्ये कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील भुसाळ वस्ती, निर्मळ वस्ती व राऊत वस्ती परिसरात बिबट्याचे रोज दर्शन होत असून रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने पताटाकल परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ मधील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. गावाचा शिवार मोठा असल्याने तसेच गावात डाळींब बागांचे प्रमाण जास्त असल्याने तसेच चारा पिकेही वाढली असल्याने लपण्यासाठी पुरेशी जागा आहे.

येथील अनेक भागात बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. गावातील राऊत वस्ती, निर्मळ वस्ती तसेच भुसाळ वस्ती परिसरात बिबट्या आढळला आहे. या बिबट्याने परीसरातील शेळ्या, कुत्रे फस्त केले आहे. अनेकांना दिवसा दर्शन झाल्याने रहिवाशांना विशेषतः महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असतानादेखील वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या परिसरात बिबट्या दिसल्याने ऊस तोडणी आणि शेतीच्या कामांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe