दिलासादायक ! देशातील रुग्णसंख्येतील घट सुरूच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात 25 हजार 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर एकाच दिवसात देशात 389 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

तर आजच्या स्थितीला सक्रिय रुग्णसंख्या सध्या साडेतीन लाखांच्या खाली गेली आहे. गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 72 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 389 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 44 हजार 157 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 24 लाख 49 हजार 306 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 80 हजार 626 रुग्ण बरे झाले आहेत.

तर 4 लाख 34 हजार 756 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 33 हजार 924 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 58 कोटी 25 लाख 49 हजार 595 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe