अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरात एका हॉटेल चालकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक मनोज दुल्लमसह सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी हॉटेलमध्ये येत उधार जेवण दिले नाही म्हणून वाघमारे यांना पाणी पिण्याचा जग, काचेचा ग्लास व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रविवारी रात्री दोन गटामध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. पाईपलाईन रोडवरील रूचिरा हॉटेलचे चालक रवींद्र विश्वनाथ वाघमारे (वय 46 रा. गुलमोहर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज दुल्लम, महेश म्याना,

दीपक विलास सगम, राकेश व्यंकटेश पासकंठी व दोन अनोळखी इसम (सर्व रा. श्रमिकनगर, सावेडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe