अहमदनगर ब्रेकिंग : नारायण राणेंविरोधात ह्या तालुक्यात गुन्हा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच पारनेर येथेही शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पारनेर पोलिस ठाण्यात जात राणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, अनिकेत औटी, विजय डोळ, नीलेश खोडदे आदी कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी पारनेर पोलिस ठाण्यात जात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला.

त्यानंतर ठाणे अंमलदाराकडे फिर्याद दाखल करण्यात आली. यावेळी बोलताना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर म्हणाले, शिवसेना संघटना, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात वाटेल ते बरळणाऱ्या नारायण राणे यांनी हिंमत असेल तर शिवसैनिकांसमोर कधीही यावं.

त्यांना त्याचा प्रसाद काय पाहिजे तो मिळेल. शिवसेनेवर आगपाखड करून वाटेल ते बरळणाऱ्याला आजपर्यंत शिवसैनिकांनी कधीही माफ केलेेले नाही. आजही करणार नाहीत असा इशारा दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe