अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-अहमदनगर येथील कुस्तीपटू पै.महेश रामभाऊ लोंढे यांनी शेवगाव कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत मानाची चांदीची गदा पटकविल्याबद्दल खा.डॉ.सुजय दादा विखे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गेल्या आठवड्यात शेवगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पै. महेश लोंढे व शिर्डीचे पै.मयूर चांगले यांच्यात कुस्ती झाली असता महेश लोंढे यांनी उत्तम कामगिरी मिळवत मानाची चांदीची गदा, ५१ हजार रुपये रोख रक्कम, मेडल व स्मृतिचिन्ह प्राप्त केले.
पै. लोंढे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आज( मंगळवार) राहुरी फॅक्टरी येथे खा.सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक उदयसिंह पाटील, भाजपा राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, मुसळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य रोहन भुजाडी, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद म्हसे, आदेश बचाटे,महेश दिवेकर, तुषार भुजाडी,कुलदीप पवार,कृष्णा शिवले,प्रतीक जाधव किरण गाडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम