नागवडे कारखान्यातून राजेंद्र नागवडे यांना हद्दपार करणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- सहकारात शिवाजीराव नागवडे बापूंनी आदर्शवत काम केले असून बापूंच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील सभासद शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखाना उतोरोत्तर प्रगतीवर होता. बापू असताना राजेंद्र नागवडे हे फक्त नामधारी होते.

मात्र बापू गेल्यानंतर राजेंद्र नागवडे यांनी शेतकऱ्यांची कामधेनू असलेला नागवडे सहकारी साखर कारखान्यात हुकूमशाही सारखा कारभार करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार केला असल्याने उद्या होणाऱ्या कारखाना निवडणूकीत शेतकऱ्यांचे प्रपचं उद्ध्वस्त करणाऱ्या राजेंद्र नागवडे यांना कारखान्यातून हद्दपार करणार असल्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले. त्यानिमत्त मंगळवारी पत्रकार परिषदेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, पंचायत समिती सदस्य जिजबापू शिंदे, मार्केट कमिटीचे चेअरमन संजय जामदार, माजी उपाध्यक्ष वैभव पाचपुते, काँगेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, नंदकुमार कोकाटे, ॲड. बापूसाहेब भोस, ॲड. बाळासाहेब काकडे अादी उपस्थित होते.

मगर म्हणाले, कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांना कारखाना चालवण्याचे ज्ञान नसून २०१९ ला तालुक्यात मूबलक ऊस असताना देखील नागवडे यांनी विनाकारण कारखाना बंद ठेवला. कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान केले. या बंद काळात कारखान्याचे कर्मचारी हे आपल्या परभणी व कऱ्हाड येथील खासगी कारखान्यावर कामाकरिता नेऊन त्या कामगारांचे पगार श्रीगोंदे कारखान्याकडून अदा केल्याचा आरोप केला.

कारखान्यावर सुरू असलेले कोजनचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने शासनाने डीपॉझिट असलेले ८० लाख रुपये जप्त केले. कोजनचे काम सुरू झाले नसताना देखील त्यासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते देखील सुरू झाल्याने उत्पन्न ऐवजी मोठे नुकसान झाले.

राजेंद्र नागवडे हे सत्तेचे लालची असून सत्ता जिकडे तिकडे नागवडे असे समिकरण असल्याने सहकार वाचवण्यासाठी नागवडे कारखाना वाचवण्यासाठी सभासदांना व सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन आपण कारखाना निवडणुकीत पॅनल उभारून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

शेलार म्हणाले, नागवडे यांनी कारखाना चालवताना गलिच्छ पद्धतीने चालवला. अनेक गोष्टींचा भांडाफोड करू नये म्हणून केशव मगर आणि माझे संचालक पद रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. नागवडे यांनी आम्हला कोणी विरोध करणार नाही, असे समजून सभासदांचा कारखाना धुवून खायचा कार्यक्रम चालू केला असल्याने आगामी कारखाना निवडणुकित केशव भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली लढून केशवभाऊ यांनाच पुढील चेअरमन करणार असल्याचे सांगितले.

नागवडे यांच्याकडे खासगी कारखाना असल्याने त्यांना निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अधिकार नाही. तसेच सभासद हाच आमचा पक्ष असल्याने निवडणुकीत कारखाना ताब्यात आल्या नंतर शेतकऱ्यांच्या उसाला सर्वात जास्त भाव देऊन कारखाना नावारूपाला आणणार आहोत. कोरोना काळात नागवडे यांनी विविध माध्यमातून पैसे कमावले असून कोरोनाने लोकांना मारले. मात्र, नागवडे यांनी कोरोना मारून खाल्ला असल्याचे शेलार यांनी सांगितले.