२४ वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-  राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक परिसरात २४ वर्षीय विवाहित तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहित तरुणी शेतामध्ये काम करत असताना आरोपी विठ्ठल तारडे हा तिच्या जवळ आला व आपण उसात जाऊ असे म्हणून तरुणीला धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.

तसेच यातील काही जर नवऱ्याला सांगितले तर तुला घरातून हाकलून देईन असे म्हणून धमकी व शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आव्हाड हे करीत आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!