अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातवादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडते आहे.
दरम्यान या प्रकरणात राणेंविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर येथेही शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहोकले यांनी राणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. कार्यकर्त्यांनी यावेळी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर ठाणे अंमलदारांकडे फिर्याद दाखल केली.
शिवसेनेवर आगपाखड करून वाटेल ते बरळणाऱ्याला आजपर्यंत शिवसैनिकांनी कधीही माफ केलेेले नाही. आजही करणार नाहीत, असे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यावेळी म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, अनिकेत औटी, विजय डोळ, नीलेश खोडदे आदी आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम