वाळू चोरणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कुंभारी परिसरात गोदावरी नदीपात्रातुन वाळू चोरी करण्यास पोलिसांनी अटक केली आहे.

नवनाथ सजन कदम हा कुंभारी येथील सबस्टेशन पॉईंट जवळून गोदावरी नदीपात्रातून दि २५ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या निळ्या रंगाच्या विना क्रमांक स्वराज्य कंपनीच्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आला.

यावेळी पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यास पोलिसांनी अटक केली असून पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर दहा हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू जप्त केली असून

कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३१५/२०२१ नुसार कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक व्ही. एन.कोकाटे हे करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe