कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या ! ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- आधीच डोक्यावर असलेले कर्ज व कोरोनामुळे आलेल्या आर्थिक अडचणी. या सर्वाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथे घडली.

गोरक्ष रामकिसन पोटफोडे ( वय ५६) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यांने गुरुवार दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

याबाबत अधिक माहिती अशी, मागील दोन वर्षापासून असलेल्या कोरोनाच्या संसर्गाने सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. परिणामी आलेली आर्थिक टंचाई.

त्यात भर पडली ती म्हणजे निसर्गाच्या अवकृपेने झालेले शेतीतीलउत्पनाचे नुकसान. त्यामुळे घेतलेले बँक कर्ज कसे फेडावे, या विचाराने ते त्रस्त झाले होते.

हाताला काम नाही शेतीत उत्पन्न निघत नाही त्यात आणखी वाढलेली महागाई यात कुटूंब कसे चालवावे आणि घेतलेले शेतीकर्ज कसे फेडावे? या विचारात ते सतत उदासीन रहात होते.

या सर्व कारणामुळे आता जगणे अशक्य असल्याच्या भावना आपल्या ते नेहमी व्यक्त करीत होते. त्यामुळे आलेल्या निराशेतून त्यांनी गुरुवारी सकाळी घरात कोणी नसल्याचे पाहून गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबत शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe