दुभाजक ओलांडून ट्रकची वाहनाला धडक; चौघे जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून समोरच्या वाहनाला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले.

याबाबत सचिन बोरुदिया यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बोरुदिया यांनी फिर्यादीत म्हटले, पुणे महामार्गावर या गाडीला नारायणगव्हाण शिवारातील नवले मळा येथे समोरून पुण्याच्या दिशेने जात असलेला ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून दुसर्‍या बाजुच्या गाडीला जोराची धडक दिली.

यात इको गाडी पलटी होऊन गाडीत असलेल्या ललिता माणिकचंद बोरुदिया, सुप्रिया सचिन बोरुदिया, राज सचिन बोरुदिया व तनिष बोरुदिया हे चौघे जखमी झाले. तर त्याचवेळी पुण्याहून नगरच्या दिशेने जात असलेल्या हिगोंली डेपोची बस गाडीवरही तो मालट्रक धडकला.

अशा तिहेरी अपघातात तीन गाड्याचे नुकसान होऊन चार व्यक्ती जखमी झाल्या. सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून अपघातातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe