अवजड वाहतुकीमुळे दोन अपघातांमध्ये दोघे ठार.

Ahmednagarlive24
Published:

राहाता :- अवजड वाहतुकीमुळे राहाता व अस्तगाव माथ्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर एकजण जखमी झाला.

गुरूवारी रात्री सातच्या सुमारास कोपरगाव नाक्याजवळ संजय छबू गिधाड (राहाता) बाजार करून घरी येत असताना रस्त्याच्या कडेला उभा असताना नगरहून शिर्डीकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकची (युपी ७७ एएन ५८०४) त्याला धडक बसली.

तो गंभीर जखमी झाले. शिर्डी येथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. मृताचा भाऊ मारूती छबू गिधाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालक अबताब अब्दुल खलीफ (कानपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दुसरा अपघात शुक्रवारी पहाटे ५.३० च्या सुमारास अस्तगाव शिवारात नळे पेट्रोलपंपासमोर झाला. संजय दिलीप राजपूत (बाभळेश्वर) व मनोज ज्ञानदेव पवार (औरंगाबाद) हे दोघे मोटारसायकलीवरून शिर्डीकडे जात असताना पाठीमागून आलेल्या वाहनाची त्यांना धडक बसली.

मोटारसायकलचालक मनोज ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला, तर मागे बसलेला संजय गंभीर जखमी झाला.अपघातानंतर वाहन न थांबता निघून गेले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment