भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करुन महाराष्ट्राचा लढवय्या इतिहास देशाला, जगाला दाखवून दिला आहे. याच महाराष्ट्राने अहंकारी दिल्लीवाल्या भाजपचा अहंकार उतरविला.

महाराष्ट्र राज्य कोणा समोरही झुकणार नाही. भाजपवाल्यांनी शिवसेनेचे बोट धरुन महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढविला आणि आम्हाला संपवायला निघाले.

भाजपने शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी दिला आहे.

आता राज्यात शेतकर्‍यांचे राज्य आले आहे, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर शहरामध्ये शिवसेनेच्यावतीने जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून जल्लोष करत नागरिकांना पेढे वाटण्यात आले.

Entertainment News Updates 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment