विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा 16 सप्टेंबरपासून तर दहावीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

या दोन्ही परीक्षा लेखी स्वरुपात होणार आहेत.सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करुन,अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान मुख्य परीक्षेत नापास झालेल्या तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असले तरी विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी मिळणारे छापील वेळापत्रक गृहीत धरून त्याआधारे परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

असे असणार आहे वेळापत्रक दहावीची परीक्षा लेखी :-
-22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर
प्रात्यक्षिक, तोंडी

-21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर
बारावीची परीक्षा
लेखी

-16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर
प्रात्यक्षिक, तोंडी
15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe