अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागासह शहरातील अनेक ठिकाणी भरदिवसा घरफोडीच्या घटना घडत आहेत. या घटनांव्दारे चोरट्यांनी पोलिसांसमोर कडवे आव्हानच उभे केले आहे.
या चोरट्यांनी सर्वसामान्यांना तर जेरीस आनले आहेच त्याशिवाय आता त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना देखील लक्ष्य केले आहे.
भिंगार शहराच्या परिसरातील लष्करी हद्दीत असलेल्या न्यूएसफोर्स आर्मड स्कूल सेंटर जवळ असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याचा बंगला चोरट्यांनी फोडला.
या बंगल्यातून चोरट्यांनी २ लॅपटॉप, हार्ड डिस्क, चंदनाची ५ झाडे असा एकूण ३ लाख ५६ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे.
याप्रकरणी लष्करातील अधिकारी पार्थ सरी यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम