मुंबई: वृक्षतोडीमुळे गाजलेल्या ‘आरे’ कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.
नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी हा पहिला निर्णय घेतल्याचे मंत्रालयातील पत्रकार कक्षात बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. परंतु वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत.
आरे कॉलनीतील शेकडो वृक्ष एका रात्रीत तोडण्यात आली, हेआम्हाला मान्य नाही.
यापुढील काळात आरेतील एकही पान आम्ही तोडू देणार नाही. मेट्रोच्या कारशेडच्या कामाचा पूर्णपणे आढावा घेऊन त्याबाबतीतला पुढील निर्णय घेतला जाईल.