आ. रोहित पवार यांच्याऐवजी आ.संग्राम जगताप यांना मंत्रीपद ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- राज्यात नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्याला किती मंत्रिपदांचा लाभ होणार, याची उत्सुकता जिल्हाभरात आहे. 

मंत्रिपदांच्या या शर्यतीत ज्येष्ठ नेते व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत-जामखेडचे नवे आमदार रोहित पवार 

तसेच शिवसेनेला पाठिंबा देणारे नेवाशाच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांची नावे आघाडीवर आहेत. नगर शहरातून दुसऱ्यांदा आमदार झालेले संग्राम जगतापही शर्यतीत असल्याचे सांगितले जाते.

उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्यातील आमदार संग्राम जगताप आणि शंकरराव गडाख हे प्रबळ मंत्री पदाचे दावेदार मानले जात असून जिल्ह्यात सत्तेचा बॅलन्स राखण्यासाठी त्यांची मंत्रीपदी वर्णी लागेल असे सूत्रांकडून समजते.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ जिल्ह्यातील उत्तर भागात येतो. गडाखांना मंत्रीपद मिळालं तरी त्यांचा नेवासा मतदारसंघ हा उत्तरेतच मोडतो. 

दक्षिण जिल्ह्यात तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात बबनराव पाचपुते तर फडणवीस सरकारच्या काळात राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली. 

जिल्ह्यातील सत्तेचा बॅलन्स राखण्यासाठी दक्षिण नगरला मंत्री पद देणे ही महाविकास आघाडीची अपरिहर्याता असेल. 

रोहित पवार यांचाही मतदारसंघ दक्षिक्षेत असला तरी त्यांची पहिली टर्म आणि पवार कुटुंबातील किती जण मंत्रीमंडळात असतील असा प्रश्‍न करत जगताप यांचेच पारडे जड असल्याचे बोलले जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe