हैदराबाद :- तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारल्याची घटना घडली आहे.
पशुवैद्य असलेली ही तरूणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शादनगर परिसरामध्ये पोलिसांना अढळून आला.
बुधवारी रात्री तिची गाडी शहराच्या एका शांत भागामध्ये पंक्चर झाली. तिने घरी फोन करून तशी कल्पनाही दिली. रात्री बराच उशीर झाल्याने घरच्यांनी तिला सुरक्षित जागेत थांबण्यास सांगण्यात आली.
मात्र गाडीसोडून तिला कोणत्याही ठिकाणी जाता येत नव्हते. पंक्चर काढण्यासाठी तिने आजुबाजूला कुठे गॅरेज आहे का बघितले.
तेवढ्यात बाजूच्या एरिआतील काही मुलांनी येऊन तिला मदतीसाठी विचारणा केली. यावेळी मदतीच्या बहाण्याने आलेल्या तिची मदत केली नाहीच पण तिच्यावर बलात्कार केला.
काही वेळानंतर प्रियंकाच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा फोन केला. मात्र नंतर तिचा फोन स्विच ऑफ आला. दुसऱ्या दिवशी पहाटे तिने सांगितलेल्या जागेवर घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.
मात्र तिचा पत्ता लागला नाही. नंतर हैदराबाद-बंगळूर हायवेवर तिचा जळून राख झालेली मृतदेह सापडला. तिच्या कपड्यांवरुन आणि गळ्यातील गणपतीच्या लॉकेटवरून तिच्या मृतदेहाची ओळख पटली.
गुरुवारी पहाटे एस. सत्यम हा दूधविक्री करणारा तरुण घटनास्थळावरून जात असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्याने स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
या प्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच ट्वीटरवर सुद्धा #RIPPriyankaReddy ट्रेन्ड करत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यात ट्रकचालक महंमद पाशा याच्यासह ट्रकच्या क्लिनरचा समावेश आहे. पोलिस त्यांची अधिक चौकशी करीत आहेत.
दरम्यान, पीडित डॉक्टरची दुचाकी कोठूर येथे सापडली आहे. दुचाकीची नंबर प्लेट काढून टाकण्यात आली आहे. शिवाय मृत डॉक्टरची पर्स आणि मोबाइल ही गायब आहे