या संघटनेने दिली 25 सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा ने 25 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

गेल्या वषी नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या किसान आंदोलनाला अधिक ताकद देणे आणि शेतकऱयांचा आवाज बुलंद करणे हा या ‘भारत बंद’चा मुख्य उद्देश असल्याचे किसान मोर्चाचे नेते आशिष मित्तल यांनी सांगितले आहे. दिल्लीच्या सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षीच्या २५ सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता. कोरोनाचे संकट असूनही त्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आगामी २५ सप्टेंबरला पुन्हा भारत बंद पुकारण्यात आला आहे, असे मित्तल यांनी स्पष्ट केले.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल सिंह यांनी लवकरच दिल्ली ठप्प करण्यासाठी दक्षिण हरियाणा आणि मेवात येथील शेतकऱ्यांना तयार राहण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त किसान मोर्चा लवकरच दिल्लीला पूर्णपणे घेरेल आणि त्यानंतर दक्षिण हरिणाया घेरण्याच्या दिशेने वाटचाल करु.

तसंच 5 सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर महापंचायतीमध्ये ‘मिशन यूपी’ची घोषणा करू, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक तहसील आणि गावामध्ये संयुक्त किसान मोर्चाची शाखा उघडली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

5 सप्टेंबर हा दिवस देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक परीक्षा असेल. मेवातच्या शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशला पोहचावे. तिथे त्यांची सर्व व्यवस्था केली जाईल, असे शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe