अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नगरच्या मल्ल पैं. महेश रामभाऊ लोंढे यांनी मानाची चांदीची गदा पटकावली आहे. त्यानिमित्त त्यांचा अहमदनगर शहर क्रीडा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या हस्ते सत्कार करत गौरव करण्यात आला.
काँग्रेस कार्यालयात झालेल्या या छोटेखानी समारंभासाठी क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेसचे सचिव मच्छिंद्र साळुंके, खजिनदार नारायण कराळे संघटक प्रदीप पाटोळे, सरचिटणीस अदील सय्यद, महेश निकम,

प्रशिक्षक सुरज गुंजाळ, आदित्य क्षीरसागर, बाळू सकट, सरफराज सय्यद यांच्यासह नगर शहर सोशल मीडिया काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सौरभ रणदिवे, कामगार नेते रावसाहेब काळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, नगर शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे.
पै.महेश लोंढे यांना त्यांचे वडील सुप्रसिद्ध मल्ल पै.रामभाऊ लोंढे यांचा कुस्तीचा वारसा आहे. लोंढे परिवारात सर्वच कुस्तीपटू आहेत. पै.महेश यांनी मानाची चांदीची गदा पटवत नगर शहराचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांनी आता महाराष्ट्र केसरीची कसून तयारी करावी आणि महाराष्ट्र केसरी जिंकत राज्यामध्ये नगर शहराचा राज्यात नावलौकिक वाढवावा. प्रवीण गीते म्हणाले की,
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून पै.महेश लोंढे यांचा सन्मान काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. नगर शहरातील क्रीडापटूंना न्याय देण्याचे काम काँग्रेस क्रीडा विभागाच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. पै.महेश लोंढे यांच्यापासून इतर तरुण मल्लांनी प्रेरणा घेत सराव करावा.
नगर शहर आणि जिल्ह्यातील क्रीडापटूंचा पाठीशी काँग्रेसच्या क्रीडा विभाग किरण काळे यांच्या माध्यमातून खंबीरपणे उभा आहे. पै. महेश लोंढे हे कोल्हापूर मधील पै. राम सारंग यांच्या तालमीमध्ये सराव करतात.
त्यांना या स्पर्धेतील घवघवीत यशासाठी पै. संभाजी लोंढे, नगरसेवक पै. सुभाष लोंढे, पै.रामभाऊ लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पै.महेश लोंढे यांच्या या घवघवीत यशाबद्दल महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.लहू कानडे आदींनी अभिनंदन केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम