अहमदनगर जिल्ह्यात भाजपला पडले खिंडार! : भाजपच्या या नेत्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कर्जत नगर पालिकेच्या निवडणुकीची सध्या धामधुम आहे. आपल्याला नगरसेवक मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. राजकीय पक्षही त्यासाठी रणनीती आखत आहेत.

भाजपचे नेते प्रसाद ढोकरीकर यांनी मागील महिन्यात भाजप जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता दरम्यान आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.प्रसाद ढोकरीकर हे कर्जतच्या राजकीय क्षेत्रातील चाणक्‍य म्हणून ओळखले जातात.

मागील काही दिवसांपासून ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसत. अखेर त्यांनी आज आमदार रोहित पवार यांच्याच उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे,भाजप नेते राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपच्या ताब्यातील नगरपंचायत जिंकण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत आणण्याचे डावपेच सुरू आहेत. सोमवारी कर्जतमधील नगरसेवकांसह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

एकेकाळी हे कार्यकर्त माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे समर्थक होते. पक्षप्रवेश केलेले ढोकरीकर भाजपचे जुने निष्ठावान कार्यकर्ते होते. अलीकडचे त्यांनी त्यांच्या खासगी शिक्षण संस्थेत आमदार पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरून पक्ष पातळीवर गंभीर दखल घेतली गेल्याने त्यांना पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते.

आता त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी कर्जत तालुक्यात खासगी दौऱ्यावर आले होते. त्यांची पाठ फिरताच कर्जत नगरपंचायतचे भाजपचे नगरसेवक नितीन तोरडमल, लालासाहेब शेळके,

भाजपचे जिल्हा संघटन सचिव पदाचा राजीनामा दिलेले प्रसाद ढोकरीकर तसेच देविदास खरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यात हडपसर येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.

पवार यांनी या सर्वांचे पाक्षात स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहत्रे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल तनपुरे, संतोष नलावडे उपस्थित होते.

सध्या कर्जतमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ही नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करत आहेत. कर्जत नगरपंचायतची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe