अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- मागील महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. तर दुसरीकडे कोकणात महापूर आला होता. यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप त्या भागातील जनजीवन सुरळीत झाले नाही.
कालपासून शहरासह जिल्हयाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. काल सायंकाळी सुरू झालेला पाऊस सलग दुसऱ्या दिवशी देखील कोसळत आहे. सलग दोन दिवस कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नगर शहरातील सीना नदीला पूर आला असुन नगर- कल्याण रोड वरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाले आहे.
मागील काही दिवस पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकरी पावसाची चातका सारखी वाट पाहत होता. अन कालपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नगर शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. त्याच प्रमाणे शहरातील बऱ्याच भागातील नागीकांच्या घरात पाणी शिरले आहे.
या पावसाने सीना दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे कल्याण रोडवरील सीनानदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असून या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.
तरी एका एक मिनी ट्रॅव्हलर बस चालकाने या पुलावरून बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बस पुराच्या पाण्यात अडकली होती.वेळीच स्थानिकांच्या मदतीने ही बस सुरक्षित बाहेर काढण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम