निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

Ahmednagarlive24
Published:

राहुरी :- मतदारसंघातील जनतेने दोन वेळा निवडून दिले. त्यामुळे मतदारांवर आपण कधीच रोष व्यक्त करणार नाही. सरकार कुणाचेही असो, सामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू.

जनतेशी जोडलेली आपुलकीची नाळ कदापि तोडणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. 

कर्डिले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारास मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीतही तशीच मते मिळतील, असा अंदाज केल्याने कार्यकर्ते गाफील राहिले.

बीडच्या पाण्यामुळे मते कमी झाली, हे मत चुकीचे आहे. आता आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करावीत. चांगल्या कामास सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजप तालुकाध्यक्ष विक्रम तांबे,

जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, बाळकृष्ण बानकर, नानासाहेब गागरे, तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे, उत्तम आढाव,

अर्जुन बाचकर, बाजार समितीचे संचालक सुरेश बानकर, नगरसेवक शहाजी जाधव, अण्णासाहेब शेटे, सुभाष वराळे, राजेंद्र उंडे,

योगेश देशमुख, विजय बानकर, साहेबराव म्हसे आदी उपस्थित होते.यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment