कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; दोन जागीच ठार 

Ahmednagarlive24
Published:

सुपा: नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील पळवे फाटा येथील हॉटेल जगदंब जवळ कारच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर) सकाळी  ७.१५ वाजता घडली.

पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अहमदनगर कडे जाणाऱ्या महामार्गावरील पळवे फाटा हॉटेल जगदंब जवळ एम एच-०४,बी वाय-९६२२ हुंडाई कंपनीच्या कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले.

पुलाला धडक देऊन कार दरीत कोसळल्याने प्रतीक ललित कुमार राठोड राहणार- खडक मला चौक तळेगाव दाभाडे,नमन कोठारी रा. बेंगलोर या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मयतांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पारनेर येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

शनिवारी दुपारी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment