अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- लोकप्रतिनिधींवर केलेल्या आरोपांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. दरम्यान आता तहसीलदार देवरे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
तहसीलदार देवरे यांनी गणेश लंके यांच्या मालकीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तहसीलदार ज्योती देवरे यांना निघोज परिसरात वाळू तस्करी होत
असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे. तहसीलदार देवरे पाहताच वाहन चालक पसार झाला. या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.
हा अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेला ट्रक आढळून आला. हे वाहन गणेश लंके यांच्या मालकीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गणेश लंके हे निघोजचे रहिवासी आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम