अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- देवळाली प्रवरा येथील विवाहित महिलेन ४ वर्षाच्या चिमुरडिसह विहरित उडी घेऊन टाकळीमिया येथे आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि 2 सप्टेंबर रोजी घडली असून रात्री उशिरा माय लेकीचा मृतदेह वर काढण्यात आले आहे.
लाख रोड कडू वस्ती येथील विद्या दिलीप कडू(वय-२५) व सिद्धी दिलीप कडू(वय-४) मायलेकी गेल्या दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होत्या. याबाबत देवळाली पोलीस चौकीत हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून दोघींचा शोध घेण्याचे काम चालू होते.
आज गुरूवारी सायंकाळी ७ वाजेनंतर हद्दीतील पंचवटी भागात एका विहिरीत सिद्धी कडू या चिमुरडीचा मृतदेह दिसून दिला. स्थानिक रहिवासी व विद्या कडू हिच्या माहेरच्या लोकांनी विद्या हिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
विहिरीतील पाण्याची पातळी जास्त व विहिरीत तळाच्या गाळात विद्याचा मृतदेह रुतल्याने विद्या हीचा मृतदेह पाण्यावर तरंगू शकला नाही.
पट्टीच्या पोहचणाऱ्या तरुणांनी रात्री १० वाजता गळाच्या सहायाने शोध घेतला असता विद्या हिचा मृतदेह गळाला लागला.दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी साई प्रतिष्ठाणच्या रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम