पुढील ३ दिवसांत राज्यात पावसाच्या सरी कायम …!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागांत ऊन-सावलीचा खेळ रंगला आहे.

त्यात पुढील २४ तासांत राज्यातील किनारपट्टी भागांत तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर कोकणातही पावसाचा जोर कायम असणार आहे. दरम्यान पुढील ३ दिवसांत राज्यात पावसाच्या सरी कायम बसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आता २ ते ५ सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी आजपासून पुढील ३ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम असणार असून अनेक भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता २ ते ५ सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी होणार असून तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. २ आणि ३ सप्टेंबरला महाराष्ट्रातील अमरावती,

नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe