अहमदनगर जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीत रंगणार निवडणुकीची रणधुमाळी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : येत्या वर्षातील जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहील. यात मुदत संपत असलेल्या आणि नव्याने झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेत प्रभागरचना, आरक्षण प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने काल शुक्रवार रोजी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कायदा सुव्यवस्था अबाधित राखीत निर्भयपणे पार पाडण्याची जबाबदारी आहे.

आयोगाच्या आदेशाप्रमाणे लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणे दक्षता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या २०११ मध्ये केलेल्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या निश्ि­चत करण्यात येईल.

प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या दहा टक्के किंवा दहा टक्के जास्त मर्यादेत ठेवता येणार आहे.

या निवडणुकीत जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील या कामकाज पाहाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत शाखेच्या तहसीलदार वैशाली आव्हाड यांनी दिली.

तालुकानिहाय ग्रामपंचायती संगमनेर : ९३ पारनेर : ८८ पाथर्डी : ७८ श्रीगोंदे : ५९ नेवासे : ५९ नगर : ५७ कर्जत : ५६ अकोले : ५१ जामखेड : ५० शेवगाव : ४८ राहुरी : ४५ कोपरगाव : २९ श्रीरामपूर : २७ राहाता : २५

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment