श्रीगोंदा:अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंद्यातील राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात आयोजीत केलेल्या सोहळ्यात एम पी एस सी परिक्षेत यश व राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत झेंडा रोवणाऱ्या नव सिताऱ्यांचा सन्मान केला.
आणि मुलींना गणवेश व सायकल भेट दिली भाग्यश्री फंड हर्षद जगताप धनश्री फंड पल्लवी हिरवे कोमल हिरडे पल्लवी पोटफोडे सोनल नवले शितल कांगुणे निकीता काटे शुभांगी वाघमारे वैष्णवी वाखारे व वैभव सोनी यांचा सन्मान उपअधीक्षक संजय सातव पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव अरविंद माने यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी तहसिलदार महेंद्र महाजन होते. पोलिस उपअधीक्षक संजय सातव म्हणाले कि मी काॅलेजला असताना असाच कार्यक्रम आयोजीत केला त्या कार्यक्रमाचा माझ्यावर प्रभाव पडला आणि पोलिस उपनिरीक्षक पदाची परिक्षा पास झालो.
अग्नीपंखच्या नवसिताऱ्यांचा सन्मान सोहळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. तहसिलदार महेंद्र महाजन म्हणाले की अग्नीपंख फौंडेशन श्रीगोंदा शाळा विद्यार्थी हे समाज परिवर्तनाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून उत्तम काम करीत आहे.
पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले कि अग्नीपंख फौंडेशन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थांमध्ये विश्वास निर्माण करीत या कामात सर्वांनी सहभाग घेण्याची गरज आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद माने मुख्याध्यापिका वंदना नगरे शितल कांगुणे वसंत दरेकर यांची भाषणे झाली आभार राजेंद्र खेडकर यांनी मानले.
यावेळी प्राचार्य तुकाराम कन्हेरकर, प्रतिभा झिटे, जेष्ठ पत्रकार अरिफभाई शेख ,ज्योत्सना भंडारी, जयश्री औटी, दत्तात्रय जगताप, राजेंद्र जामदार ,संदीप घावटे, हनुमंत फंड ,शोभा लगड ,चेतना मागडे आदि उपस्थित होते