पारनेर : गेल्या महिन्यात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे आमदार नीलेश लंके यांचा जनता दरबार सोमवारी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्ता आवारी यांनी दिली.
आ. लंके हे सध्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनानिमित मुंबईत असून त्यांच्या वतीने राहुल झावरे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना जनता दरबाराच्या आयोजनासंदर्भात पत्र दिले आहे.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जनता दरबारात तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांची तड लावण्यात येणार असल्याचे झावरे यांनी सांगितले.