Ahmednagar News : मंदिरावरील ६ किलो वजनाच्या कलशाची चोरी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील प्रवरा नदीतीरावर असलेल्या सिद्धीबाबा मंदिर परिसरात असलेल्या जानाई आणि कासाई मंदिर अशा दोन मंदिरावरील प्रत्येकी 3 किलो याप्रमाणे सहा किलो वजनाचे दोन कलश अज्ञात चोरटयांनी दि 10 सप्टेंबर च्या रात्री चोरीला गेल्याची घटना घडली आहे

गेल्या महिनाभरात मंदिरातील चोरीची ही दुसरी घटना असल्याने गावात मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोल्हार खुर्द येथील प्रवरा नदी पत्रावर सिद्धिबाबा मंदिर परिसरात जानाई, बाणाई, तसेंच श्री दत्त मंदिर आहे, या ठिकाणी नदी पात्र असल्याने झाडांची वनराई आहे,

त्यामुळे दिवसभर अनेक भक्त हे दर्शनासाठी येऊन आरामासाठी देखील दिवस दिवसा बसलेले असतात, नेहमी भक्तांची वर्दळ असल्यामुळे अनेक  नागरिकांची दिवसभर या ठिकाणी ये जा सुरु असते,

अशाच वातावरणाचा फायदा घेत दि 10 सप्टेंबर च्या रात्री जानाई आणि कासाई मंदिरावरील प्रत्येकी तीन किलो वजनाचे पंचधातू चे कलश चोरी झाल्याची घटना घडली आहे,

सदर घटना मंदिराची नियमित पूजा करणारे संतोष शिरसाठ हे पूजा करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आली, सदर घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील, सरपंच यांना दिली.

गेल्या मागील महिन्यात नगर मनमाड राज्यमार्गालगत असलेल्या महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी देखील अशाच पद्धतीने चोरी गेली आहे.

त्यामुळे येथील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तरी संबंधित  चोरट्यांचा तात्काळ तपास लावावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा कोल्हार खुर्द ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe