राहता :- तालुक्यातील लोणी गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. फरदीन अब्बु कुरेशी (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
फरदीन हा श्रीरामपूर शहराचा रहिवासी होता. रविवारी संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ सोल्जर आयुब शेख, शाहरुख शहा गाठन (सर्व रा. श्रीरामपूर) अशांनी त्याला नाशिक येथे सोबत येण्याबाबत जबरदस्ती केली.
धमकी देऊन त्यास बरोबर घेऊन जाऊन त्यानंतर लोणी येथे आणून त्यांच्यासोबत असलेले उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी ता.राहता ) अशांनी मिळून वादाचे कारणावरुन बंदुकीची गोळी मारून फरदीन कुरेशीला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे.
मयत फरदीन यांच्या आईने लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष सुरेश कांबळे, सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख, शाहरुख शहा गाठण ( सर्व रा. श्रीरामपूर), उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी ता. राहता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.