अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचू बंधू विशाल बबन वाकळे यांचं नुकतंच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३१ वर्षांचे होते.
त्यांना आज दुपारी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता ते मयत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
मयत विशाल वाकळे हे मनमिळावू आणि मित्रांच्या मैत्रीची कदर करणारे होते. त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मित्र परिवारासह आप्तेष्टांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम