आमदार तनपुरेंना मंत्रिपद मिळाल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल !

Ahmednagarlive24
Published:

तिसगाव : राहुरी -नगर -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांची नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस, या तीन पक्षांनी एकत्र येत नव्याने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये यांची वर्णी लावावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह तनपुरे समर्थकांकडून करण्यात आली आहे. 

मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने लाभले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रिमंडळात तनपुरे यांची वर्णी लागावी.

फक्त सत्ता असून उपयोग नाही तर दृष्टिकोन विकासात्मक असायला हवा आणि आलेल्या निधीच्या प्रत्येक पैशाचा उपयोग जनतेसाठी आणि विकासासाठी व्हायला हवा. आमदार तनपुरे यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.

आ. तनपुरे यांचे मामा नवनिर्वाचित कॅबिनेटमंत्री जयंत पाटील यांच्या रुपाने राहुरी मतदारसंघाची विकासाची वाट मोकळी झाली आहे; परंतू आमदार तनपुरे यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल,

त्यामुळे आ. तनपुरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी मागणी तनपुरे समर्थक सरपंच अमोल वाघ , युवानेते भारत लोंढे, दुर्योधन लोंढे, सुरेश बर्फे, अनिल गुंजाळ, तुळशीदास शिंदे, जालिंदर वामन, सुभाष दानवे , आबासाहेब अकोलकर, उपसरपंच राजू पाठक, भैय्या पाठव, सुनील पुंड, राजू शेख, माजी सरपंच सुधाकर वांढेकर, शिवाजी मचे, के. एम. मचे सर, कांता गोरे, भागिनाथ गवळी, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment