अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरुखे गावात राहणारे दिलीप आभाळे हे काल त्यांच्या नंदू शिरसागर नावाच्या मित्रा सोबत काल गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाट्याजवळ काही तृतीयपंथींनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.
त्यावेळी झालेल्या वादात चार तृतीयपंथी आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने दिलीप आभाळे यांना त्यांच्या एकरुखे गावात जाऊन लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली असून एलसीबी ने बारा तासात 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पैसे दिले नाही म्हणून मनात राग धरून दृतिय पंथीयांनी इतर साथीदारांना बोलावून दिलीप आभाळे यांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला
त्यामुळे मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून.
एलसीबी च्या पथकाने तात्काळ स्वतंत्र वेग वेगळी पथके नेमून गुन्ह्यातील आठ आरोपी बारा तासाच्या आत वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. अजून किती आरोपी आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम