अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उशीरा राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द केली.
१२ सदस्यांची नावे जाहीर होताच नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट विविध समाज माध्यमातून व्हायरल झाल्या.
शुक्रवारी (दि.१८) १२ विश्वस्तांपैकी ११ विश्वस्त पदभार घेण्यासाठी शिर्डीत दाखल झाले. यावेळी अध्यक्ष आशुतोष काळे व विश्वस्तांच्या समर्थकांनी विश्वस्तांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती.
या गर्दीतच आशुतोष काळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे समर्थकांनी स्वागत केले. यावेळी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे व कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन केले गेले नाही.
आशुतोष काळे यांनी रविवारी (दि.१९) त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी’,
अशी पोस्ट केल्याने आशुतोष काळे सहकाऱ्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच धांदल उडाली आहे. या पोस्टमध्येच आशुतोष काळे यांनी म्हटले की, श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम