अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप देखील कायम आहे. आजही कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशंशाकडून वारंवार करण्यात येत आहे.
यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार तसेच साईबाबा संस्थांचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष काळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार तसेच साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोनासदृश्य लक्षणं जाणवत होती.
मात्र आता चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती काळे यांनी ट्विटरवर दिलीय. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच काळे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे सुरु केलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साई संस्थानचे अध्यक्षपद स्वीकारले होते. लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान तसेच मी लवकरच बरा होईल.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वीच जाहीर कार्यक्रमात त्यांनी साई संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता.
या कार्यक्रमात त्यांच्यासोबत संस्थानचे सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात विश्वस्त, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
आता आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे काळे यांनी कोव्हीशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम