बलात्कार करुन ‘ति’चा खून ! धक्कादायक घटना उघडकीस …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  देहूरोड हद्दीत असलेल्या जुना पुणे मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर एका युवतीचा खून झाल्याची धक्कादायक घटना साेमवारी पहाटे उघडकीस आली.

याप्रकरणी एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिताली धडस असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे तसेच तुकाराम धोंडीबा धडस असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकारामच्या मित्राने फोन करुन आपण बुधवार पेठेत जाऊन मज्जा करूया त्यावर तुकारामने मित्राला येथेच मज्जा करू मी सर्व व्यवस्था केली आहे असे सांगितले.

तुकारामने आपल्या वहिनी मिताली यांना घोरवडेस्वर डोंगरावर घेऊन जाऊन अगोदर तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर ओढणीने गाळा आवळून दगडाने ठेचून मिताली हिचा खून केला.

देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. य़ा घटनेचा तपास तळेगाव पोलिस करीत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिली.

दरम्यान याबाबत मिताली यांचे पती साेमनाथ धडस म्हणाले तुकाराम याला मी सांगितले की कामावर चाल तर त्याने मला उर्से येथे जायचे आहे असे सांगितले.

त्यानंतर मी त्याला तुझ्या वहिनीला पिठाची गिरणी दाखव असे सांगितले. परंतु त्याने असे न करता माझ्या पत्नीला सव्वा दहा वाजता डोंगरावर घेऊन गेला. तेथे तिचा खून केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News