अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून राज कुंद्राला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
राज कुंद्रा सोबतच साथीदार रायन थोरपेलासुद्धा जामीन दिला आहे. मागील दोन महिन्यांपासुन राज आणि रायन तुरूंगात होते. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत आहे. पोलिसांच्या चैकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली.

राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. दरम्यान राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड असलेल्या रायन थोरपेला अटक झाली होती.
थोरपे हा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या निकटवर्तीय आहे. वियान गेमिंग प्रायव्हेट लिमीटेड आणि वियान इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये राज आणि रायनने सोबत काम केलं आहे. दरम्यान, राज कुंद्रावर अश्लिल चित्रपट बनवणे आणि मोबाईल अँपवरून प्रसारित करणे यामुळं अटक करण्यात आली होती.
राज कुंद्राच्या घरावरील छापेमारीत हॉटशॉट अॅपसाठी बनवलेल्या व्हिडीओ आणि सर्व्हर पोलिसांच्या हाती सापडले होते. या प्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा जबाबही नोंदवला होता. जबाबात शिल्पा शेट्टीने Armsprime मिडीया कंपनीबाबत माहिती दिली होती.
ही कंपनी शॉर्ट व्हिडीओ बनवत असल्याची माहिती तिने दिली होती. त्यात अनेक मॉडेल स्वेच्छेने एक्सपोज करत होत्या. आपण आपल्या कामात गुंतलो असल्याने पतीला त्याच्या कामाबाबत कधीही विचारणा केली नाही. तसेच त्यानेही त्याच्या कामाबाबतची माहिती दिली नाही. त्यामुळे या प्रकरणी आपल्याला माहिती नसल्याचे तिने सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम