अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शवले. कारण शुक्रवारी अमेरिकन बाजारात कमकुवतपणा दिसून आला.
एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की भारतीय निर्देशांक त्यांच्या जागतिक स्पर्धकांप्रमाणेच सुरु झाले. ट्रेडिंगच्या सुरुवातीला निफ्टी १४० अंकांनी खाली होता. त्यानंतर ओपनिंगनंतर निर्देशांकांने निचांकावरून सुधारणा केली आणि एकूण ट्रेडिंग हिरव्या रंगात दिसून आली.
दरम्यान, जागतिक विक्रीच्या दबावामुळे निर्देशांकाने आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण विक्री अनुभवली. त्यामुळे दुसऱ्या सत्रात निर्देशांकाने लाल रंगात विश्रांती घेतली. हे नुकसान १ टक्क्यांचे होते. तर दुसरीकडे निफ्टी बँक निर्देशांकाने दिवसभरातील उच्चांकावरून ७०० अंकांची घसरण घेतली.
बेंचमार्क निर्देशांकाच्या ट्रेंडनुसारच स्मॉल कॅप आणि मिडकॅप निर्देशांकांनी व्यापार केला. बेंचमार्क निर्देशांकातील घसरणी प्रमाणेच स्मॉल कॅप आणि मिडकॅपने अनुक्रमे १.७३% आणि २.१६ टक्क्यांची घसरण अनुभवली. सेक्टरल आघाडीवर, फक्त निफ्टी एफएमसीजी निर्देशांकाने सकारात्मक स्थिती राखून ठेवण्यात यश मिळवले.
या निर्देशांकांनी जवळपास १ टक्क्यांनी वाढ अनुभवली. तर इतर सर्व सेक्टरल निर्देशांक लाल रंगात स्थिरावले. निफ्टी मेटल हा सर्वात मोठा लूझर ठरला. तो ६ टक्क्यांनी पडला. तर पीएसयू बँक आणि रिअॅलिटी निर्देशांकांनाही नुकसान भोगावे लागले.
स्टॉक्सच्या आघाडीवर, निफ्टी ५० पॅकपैकी ४३ स्टॉक लाल रंगात स्थिरावले. त्यापैकी टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि हिंडाल्को हे टॉप लूझर्स होते. ते ६ ते १० टक्क्यांदरम्यान कोसळले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी आणि बजाज फिनसर्व हे आजच्या सत्रातील टॉप गेनर्स ठरले.
त्यांनी १ ते २ टक्क्यांच्या आसपास नफा कमावला. गेल्या काही दिवसांत चीनकडून कमी मागणी आल्याने स्टीलचे स्टॉक दबावाखाली आहे. रिअल इस्टेटची कमकुवत आकडेवारी तसेच साथीच्या आजाराची चिंता तसेच हाय यील्ड डेव्हलपर मार्केटमधील कर्जाची चिंता यामुळे सध्याच्या स्टील उत्पादनात कपात दिसून आली.
टाटा स्टील, हिंडाल्को, जेएसड्ब्लयू हे सर्व ६ ते १० टक्क्यांपर्यंत पडले. एकूणच, जागितक पातळीवर विक्री सुरु असताना, भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांक- सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी सोमवारी थोडी घसरण अनुभवली. मेटल आणि बँक स्टॉकमध्ये मोठी घट दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही दिवसातील निचांकी पातळीवर अस्थिर दिसून आले.
सेन्सेक्स ५२५ अंकांनी घसरून ५८,४९१ वर स्थिरावला तर निफ्टीने १८८ अंकांची घसरण घेत १७३९६ अंकांवर विश्रांती घेतली. येत्या काही दिवसात लक्ष ठेवण्यासारखी लेव्हल म्हणजे अपसाइडवर निफ्टीच्या १७६००-१७७०० या लेव्हलवर लक्ष ठेवावे लागेल. तर डाऊनसाइडच्या १७२५०-१७२०० या लेव्हलवर लक्ष ठेवावे लागेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम