‘एसकेपी’ची वाटचाल कौतुकास्पद; आदरणीय अजितदादा पवार यांचे गौरवोद्गार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 : बालेवाडी परिसरातील श्री खंडेराय प्रतिष्ठानने (SKP कॅम्पस) नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंतची वाटचाल केली असून, यापुढेही ती कायम राहील. १९९४ मध्ये मी खासदार असताना या संस्थेचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते.

या गेल्या २८ वर्षांत या संस्थेचे रुपांतर वटवृक्षात झाले असून, संस्थेच्या वाटचालीचा मला आनंद आहे,’ असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी रविवारी काढले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या लक्ष्मी माता चौक येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच, दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवूनही पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडसर ठरणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या अजित आकांक्षा शिष्यवृत्तीचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरणही करण्यात आले. सानिका विनोद गरड, अस्मिता गजानन पवार आणि साक्षी सचिन सुरवसे या विद्यार्थिनींना अजितदादांच्या हस्ते रोख ११ हजार रुपये देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी पाठबळ देण्यात आले.

शिवाय, बालेवाडी परिसरात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रंथालय आपल्या दारी’ या उपक्रमाच्या ‘सागरसेतू’ ॲपचेही उद्घाटन आदरणीय अजितदादांच्या हस्ते झाले. या वेळी आदरणीय अजितदादा बोलत होते. डॉ. सागर बालवडकर यांनी आदरणीय अजितदादा पवार यांचे स्वागत केले.

तसेच, पक्षाच्या, एसकेपी कॅम्पसच्या वतीने आयोजित उपक्रमांची माहिती दिली. ‘एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्यांचे सुपुत्र डॉ. सागर बालवडकर ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.

संस्थेने आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जपत केलेली वाटचाल नक्कीच कौतुकास्पद आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे मुख्यमंत्री असताना गोरगरिबांची मुलेही शिकली पाहिजेत, या भावनेतून अनेकांना शिक्षणसंस्थांसाठी मदत केली. त्याचे खूप चांगले चित्र आज पाहायला मिळत आहे.

केवळ बालेवाडीतीलच नव्हे, तर परभणी, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून बालेवाडीत स्थलांतरित झालेल्या कुटुंबांतील मुले या संस्थेत शिकत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या मुली शिकल्या पाहिजेत, ही भावना आज पालकांमध्ये दृढ होत आहे. आणि अशा पालकांच्या भावनांना अजित आकांक्षा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून डॉ. सागर बालवडकर हे पाठबळ देत आहेत.

ही सामाजिक बांधिलकी अशीच जपली गेली पाहिजे,’ असे प्रतिपादन आदरणीय अजितदादांनी केले. तसेच, ‘डॉ. सागर बालवडकर व प्रा. सौ. रुपाली बालवडकर यांच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील. त्याचा निश्चितच या भागातील नागरिकांना फायदा होईल. आपल्याकडे कुणी लक्ष देत नाही, अशी भावना सामान्यांची, स्थलांतरित झालेल्या नागरिकांची असते.

परंतु, या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ही भावना निश्चितच दूर होईल,’ असा विश्वास आदरणीय अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक श्री. बाबुरावजी चांदेरे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘बाणेर – बालेवाडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच सूस – म्हाळुंगे या नव्याने महानगरपालिकेत समाविष्ठ झालेल्या गावांच्या विकासासाठी सहकार्य करावे,’ अशी विनंती चांदेरे यांनी अजितदादा पवार यांना केली.

त्यावर, ‘नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा या मिळायलाच हवेत, त्या दृष्टीनेच आम्ही कार्यरत आहोत. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. परंतु, त्यावर निश्चितपणे मार्ग काढला जाईल आणि बाणेर – बालेवाडीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल.

तसेच, म्हाळुंगेतील टीपी स्कीमबाबतही अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल,’ असे आश्वासन आदरणीय अजितदादा पवार यांनी दिले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतजी जगताप, ज्येष्ठ नगरसेवक बाबुरावजी चांदेरे, एसकेपी कॅम्पसचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर, प्रा. सौ. रुपाली बालवडकर,

नगरसेवक मयूर कलाटे, सुनील चांदेरे, डॉ. दिलीप मुरकुटे, अशोकराव बालवडकर, नितीन कळमकर, विशाल विधाते, सौ. पूनम विधाते, धनाजी विनोदे, शेखर सायकर, चेतन बालवडकर, सुहास मोते, युवराज कोळेकर, मनोज बालवडकर, नीलेश पडाळे, किरण बालवडकर यांच्यासह अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe