Ahmednagar News : बंधाऱ्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव बंधाऱ्यावरुन पडून चांदेगाव येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(ahmednagar news one dies after falling)

चांदेगाव येथील रंगनाथ गोविंद वायदंडे हे सायकलवरुन बंधारा पार करत असताना तोल जावून खाली पडले.

त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले परंतु त्यांचे निधन झाले .मयत रंगनाथ वायदंडे हे सायकल वरुन

बेलापुरकडे येत होते अचानक त्यांचा तोल जावुन ते खाली फळ्या टाकण्याच्या कठड्यावर पडले त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर ईजा झाली होती.

आसपासच्या नागरीकांनी त्यांना तातडीने बाहेर काढले त्यांना तातडीने प्रवरा मेडीकल हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले परंतु डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे

त्यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News