अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील आणि कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रानाफुना चौकात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी ६ वाजता छापा टाकून ९६० रुपयांची देशी दारू पकडली आहे.
यामुळे अवैध धंदेचालकांत खळबळ उडाली आहे. याबाबत शिर्डी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोहेगाव येथ रानाफुना चौकात अवैध दारू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती समजली.
त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अशोक आनंद आहिरे (वय २७) याच्याकडून ९६० रुपयांच्या देशी दारूच्या १६ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस नाईक किशोर औताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अशोक आहिरे याच्या विरोधात गुरनं.३१६/२०२१ मुं.पो.कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस नाईक वेताळ हे करत आहे. शिर्डी पोलीस ठाण्याची नव्याने सूत्रे स्वीकारलेले पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध धंदे चालकांत एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाणे हद्दीत कोठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम