अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- आरोग्य विभागाची परीक्षा या महिन्यात २५ आणि २६ सप्टेंबरला होणार होती. पण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील चुकीच्या माहितीमुळे राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मात्र ही परीक्षा रद्द झाली नसून पुढे ढकलण्यात आली आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच हीच परीक्षा येत्या १५ -१६ किंवा २२-२३ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात होती. भाजपनेदेखील याच मुद्द्याला घेऊन मोठा गदारोळ केला होता. परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
आता हीच परीक्षा कधी होणार हे टोपे यांनी सांगितले आहे. १५-१६ किंवा मग २२-२३ ऑक्टोबरला आरोग्य विभागाची परीक्षा होण्याची शक्यता आहे, असे टोपे यांनी म्हटलंय.
दरम्यान शनिवारी, रविवार सुट्टीचा दिवस होता. मात्र सोमवारी पहिल्या वर्किंग डे दिवशी लगेच ११ वाजता या संदर्भात आमचा विभागाचे अॅडिशनल चीफ सेक्रेटरी डॉ. व्यास, हेल्थ कमिशनर रामास्वामी, डायरेक्टर अर्चना पाटील हे सगळे उपस्थितीत राहून न्यासासोबत बैठक घेतील.
त्यानंतर पुढील तारखा ठरवल्या जातील. कुठल्याही परिस्थितीत येणारी जी तारीख असेल, दोन-पाच दिवस जास्त लागले तरी हरकत नाही, पूर्ण ऑडिट करून सर्वोनुमते चर्चा करून आम्हाला निर्णय कळवतील.
त्यानंतर आम्ही यासंदर्भात निर्णय घेऊ. ऑक्टोबरच्या १५, १६ किंवा २२, २३ तारखेला परीक्षा होऊ शकते. जर १५ ची जी रेल्वेची परीक्षा आहे, ती जर पुढे ढकलता आली, तर आपल्याला १५, १६ परीक्षा घेता येईल. नाहीतर २२, २३ तारखेला परीक्षा उशीरा घेतला येईल,’ असे टोपे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम