अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- ओबीसी आरक्षण संदर्भातील अध्यादेशावर राज्यपाल यांनी सही केल्याने समाजाला दिलासा मिळाला असून, ओबीसी आरक्षण वाचविण्याच्या प्रयत्नांना या निर्णयाने बळकटी मिळाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले.
ना.वडेट्टीवार बीड येथील कार्यक्रमाला जातांना त्यांनी नगरला धावती भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. बुरुडगांव रोडवरील हॉटेल प्रभा पॅलेस येथे संघटनेचे शहरजिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेवक विक्रम राठोड, डॉ.सुदर्शन गोरे, भिंगार अर्बन बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर,
बुर्हाणनगर तुळजा भवानी मंदिराचे विश्वस्त अॅड.अभिषेक भगत, अवधूत फुलसौंदर, राजेश सटाणकर आदि उपस्थित होते. हक्कासाठी लढणार्या या संघटनेने जसे संघटन मजबूत केले, तसे एकमेकांवर कुरघोडी न करता समाजाचा विकास साधून कर्तव्य करावे,
असे आवाहन करुन ना.वडेट्टीवार पुढे म्हणाले, ओबीसी, व्हीजे,एनटी जनमोर्चाच्या नगर शहर जिल्हा शाखेने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात संघटना वाढविण्यास सहकार्य देण्यास पुढे यावे. पुरग्रस्तांना दिलेली मदतीसारखे विधायक कार्यात नगर मागे नाही, याबद्दल मंत्री महोद्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम