अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- युवा व्यावसायिक आदित्य चोपडा गेल्या दोन-तीन दिवसापासुन बेपत्ता होते. बुधवारी दुपारी त्याच्या मृतदेह नारायणगव्हाण येथील महामार्गालगतच्या विहिरीत आढळून आला आहे.
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळ कडूस ता.पारनेर येथील रहिवाशी असलेले चोपडा परिवार व्यावसायानिमित शिरुर जि. पुणे येथे स्थायिक झालेला आहे.
या परिवारातील युवा उद्योजक आदित्य चोपडा गेल्या दोन दिवसापासुन बेपत्ता असल्याची फिर्याद कुटुंबियांनी सुपा पोलिस स्टेशनला केली होती.सुपा पोलिसांनी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास चालू केला होता.
बुधवार दि .२९ सप्टेंबर २०२१ रोजी काही तरुण बबन धोंडीबा नवले यांच्या विहरीजवळ गेले असता तेथे एक मृतदेह आढळून आल्याचे त्याच्या लक्ष्यात आले.
त्यांनी तात्काळ ही माहिती जवळील नागरिकांना व सुपा पोलिसांना सांगितले. पो लिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली असता मृतदेह चोपडा याचा असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत तात्काळ नातेवाईकांना कळवण्यात आले. मृत व्यक्तीच्या नातेवाईक तेथे आल्यावर त्यांनी आक्रोश करत अहमदनगर पुणे महामार्गावर नवले मळा येथे रास्ता रोको अंदोलन केले. मृताचे नातेवाईक व जमा झालेल्या नातेवाईकामुळे महामार्ग बंद होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम