अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर शहर पोलिसांनी एक दुधाचा टँकर अपहरण करून पळून नेणार्या आरोपीस तब्बल तीन वर्षांनंतर थेट पंजाब राज्यात जाऊन सापळा रचून अटक केली.
दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील बाभळेश्वर रस्त्यावर असलेल्या प्रभात डेअरी परिसरातून दुधाचा टँकर अपहरण करून पळवून नेण्यात आला होता.

file photo
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रभात डेअरी परिसरात सीसी फुटेजचा बारकाईने तपास करून पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन सापळा रचून हॅप्पी नावाच्या या गाडी चालकास पकडले.
त्याने दुधाचा टँकर चोरल्याचे समोर येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक़ मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे,
डीवायएसपी संजय मिटके पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन ही कामगिरी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम