अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- नगरच्या केडगाव उपनगरात असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला तिघा जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे.
विशेषबाब म्हणजे भरदिवसा हा सगळा प्रकार झाला असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत उद्धव विठ्ठल पवार (वय 50, रा.अयोध्यानगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तसेच कोतवाली पोलीस पथकाने तत्परता दाखवत तातडीने या घटनेतील तिनही लुटारुंना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पवार यांचा ट्रान्सपोर्ट व्यावसाय असून त्यांचे केडगावच्या औद्योगिक वसाहत परिसरात कार्यालय आहे.
दुपारच्या सुमारास ते औद्योगिक वसाहत परिसरातून जात असताना गुंदेचा गोडाऊन जवळ लखन कावळे, साई ठोसर, कुणाल भालेराव यांनी त्यांना अडवले.
या तिघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्यातील एकाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 50 हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देवून हे तिघे जण पसार झाले.
हा प्रकार घडल्यानंतर पवार यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी या तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात तिन्ही आरोपींना गजाआड केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम